Monday, 7 July 2014

Unsaid Unheard #1

आज बरयाच दिवसांनी काहीतरी लिहिण्याचा मूड आला... इतके दिवस मनात विचार तर बरेच होते, पण हरवलेल्या पाऊसासारखे शब्द सापडत नव्हते.
रोज आकाशात ढग आणि इथे मन... भरुन यायचं!
आज मात्र वर भरुन आलेल आभाळ आणि माझं मन दोन्हीही बरसु लागले... अगदी मन पूर्ण मोकळं होईपयत रडाव, तसा बराच वेळ पाऊस पडला.. काही वेळाने शांत झाला... सगळं वातावरण कसं स्वच्छ झालं! मलाही मन मोकळं झाल्यासारख वाटलं...
इतके दिवस मनात साचून राहिलेले विचार बाहेर पडले...
थोडे शब्दांतून... अन् थोडे डोळ्यांतून...! :')

A.D.

No comments:

Post a Comment